शाईपेन...!
दोन..
माझी
मराठी शाळा ,अक्षर, भाषा ,शिक्षक, वर्ग, मित्र-मैत्रिणी आणि या सगळ्यांसोबत मनात
दडलेल्या आणि कधीही पुसता न येणाऱ्या काही आठवणी. थोडयाशा फिकट नक्कीच झालेल्या ,
जसं शाइपेनातली शाई संपत आली की, होतं ना तसंच काहीसं....
.............................................................................................
माझी आणि अक्षरांची तोंडओळख अर्थातच पाटी पेन्सिल पासून होऊन कार्यक्रम प्लास्टिकच्या
फिकट हिरव्या ,गुलाबी रंगाच्या अक्षरे गिरवण्याच्या स्लेट आणि शिसपेन्सिल यांच्यापर्यंत
आला होता. वळणदार आणि घोटीव अक्षरासाठीची हि पाटी घराघरात असायचीच. आणि हो मुलं
कितीही असली तरी पाटी मात्र एकच असायची..!
त्याच्याबरोबरीनेच, थोडंसं पुढे मागे ,टाक आणि शाई असं समीकरण चालू झालं .
घरामध्ये वडिलांचा भर असायचा की टाकाने
लिहिता आलंच पाहिजे.आणि मग शुद्धलेखन आणि हस्ताक्षराचा घरात एक खेळ रंगायचा,एक छोटसं
पान लिहायला बराच वेळ लागायचा , किती ते नाही आठवत , परंतु तोपर्यंत खाली
खेळणाऱ्या मुलांचा मात्र एक डाव संपत आलेला असायचा.
इतक्या लहान वयात , गणपतीला व्यासांनी लेखनिक म्हणून
ठेवून, महाभारत लिहून घेतलं, अशा कथा किंवा कालिदासाच्या कथा एव्हढंच काहीसं
थोडंफार ऐकलेलं होतं. त्यामुळे ते टाकाचं शाईत पुनःपुन्हा बुडवून लिहिताना आपण
कोणीतरी गणपती ,कालिदास असं श्रेष्ठ असल्यासारखं वाटायचं, आणि खूप मजा यायची!!
लाल रंगाच्या, जाड निबेच्या टाकानंतर , प्रवास
शाईपेनवर आला , त्याच्याशी हातमिळवणी झाली आणि मग सुरु झाला तो खरा सोहळा..! दुसरी,
तिसरीचं वय असेल. पेनानी घेतलेली कंपासातली जागा, त्यामुळे अचानक थोडे मोठ्ठे झालो
याची खात्री वजा जाणीव . त्यावेळेस सगळ्यात पहिलं वापरलेलं , किंवा कदाचित सर्वच जण
वापरत असतील असं पेन म्हणजे एअर-मेल ..! रंगीबेरंगी रेषांच्या नक्षीत किंवा
साध्याच एका रंगात हे पेन मिळायचं. मग त्याच्याबरोबर शाईची दौत , आणि हो शाई
भरण्यासाठीचा ड्रॉपर, सगळंच कसं अजब गजब असायचं.
एका इयत्तेतून दुसऱ्या इयत्तेत जाताना मग या
वर्षी नवीन पेन मिळणार का अशी हुरहूर असायची. आमच्या घरी एक लोखंडी कपाट होत ,त्यामध्ये
वडिलांचा एक कोट असायचा , त्याचा मोठ्ठा खिसा हे आमच्यासाठी खाजीन्याहून काही कमी
नसायचं..! या खिशात छान छान फुलांच्या नवीन शिस्पेन्सिली, छान छान खोडरबर , आणि
काही शाईपेन असायचे. याला हात लावायला अर्थातच मज्जाव. पण आम्ही हळूच कधीतरी, लपून
छपुन, कोणकोणते पेन आहेत याची खातरजमा करून घ्यायचो , आणि आपापसात ठराव व्हायचा ,काळं
तुझं ,लाल माझं असा.(मोठी भावंड अर्थातच त्यांचा ‘थोरपणा ‘ दाखवायची...!) या मध्ये
चुलत, मामे ,मावस, अत्ते अशी सगळी भावंडं एकदिलाने सहभागी व्हायची, सुट्टीतला खाजीन्याच्या
पाहणीचा आणि त्यानंतर लुटीचा महत्वाचा खेळ..! पण लूट कसली, आम्ही रोज फक्त त्यांना
हातात घेऊन पाहून ठेवून द्यायचो.
सुट्टी संपली,निकाल लागलं कि मग मात्र अभिमानाने
, घरी मागणी असायची, मला यावेळेस नवीन पेन हवंय . म्हणजे पुस्तकं मी वापरेन जुनी पण
पेन नवीन हवंय..! अगदी घरातलं असलेलं नवीन दिलत तरीही चालेल..!.....
अरेच्चा.... एक बिंग फुटलं अशी जाणीव झाली कि
पोटात गोळा यायचा...!
Mala mazya Hero pen jamwayche diwas athawle... Navin pen, navin pustaka, ani mothyya suttti nantarcha shalecha pahila diwas... and of course, Aaicha dhak... '' 3 pana shudhha lekhan kelya shivay khali khelayla jaycha nahi.... ani paan bharun hava..ugach sutta sutta 4 olit sampla asa chalnar nahit ''..
ReplyDeleteNostalgia purna... thanks once again for tking me thru the memory lane...
Wait was worth indeed! Pratyek shabdasobat shaaipenaatil shaai gahiri hot jaatiye..athavani adhik spashta hit jaatahet...tuzya shabdaatun aksharashahajune prasang hubehub prakat hot ahet...khuup chaan Urja...i hope shaaipen atahi busych asel...bcoz i m waiting for sure for the next!:-):-)
ReplyDelete