शाईपेन..!
एक..
आज उठावसंच वाटत नव्हतं..साहजिकच आहे , काल
रात्री जागून ३ सिनेमे एका पाठोपाठ एक पहाटपर्यंत पहिले आणि शेवटी लाज वाटून (किंवा
वयामुळे येणाऱ्या नकोशा पोक्तपणामुळे कदाचित..! )एका क्षणी निद्रादेवीची आराधना
सुरु केली. त्यामुळे उठायला साहजिकच उशीर झाला ,पण चालतं कधीतरी.. आणि उठल्यावर जर गरमागरम वाफाळता चहा आणि
पोहे ; ते ही नवऱ्याने करून दिलेले तर ..! व्वा, क्या बात है!
मस्त
एक एक घोट घेत ,मी काल दुपारपासून अत्यंत सावत्र वागणूक दिलेल्या, माझ्या फोनकडे सरतेशेवटी
बघितलं . माझ्या दात घासणे इत्यादी दिनाक्रमातील अबाधित दिनक्रम म्हणून WhatsApp सुरु केलं. आणि मग मात्र वेगळाच प्रवास सुरु
झाला .
बरं,
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जवळपास तीन एक वर्षानंतर निळ्या शाईच्या शाईपेनाने हे
सगळं अतिशय जुनाट २००५ च्या डायरीत लिहित आहे.......!
हं
,तर वेगळा प्रवास तो असा कि एका अतिशय रसिक व्यक्तीशी मी बोलत होते , मनापासून
गप्पा चालू होत्या , आणि बोलता बोलता मी त्याला म्हणाले , मला असं वाटत कि मी
याच्यावर लिहायला पाहिजे. पडत्या फळाची आज्ञा असल्याप्रमाणे वीज गेली आणि मी गपगुमान
मोबाईल बाजूला ठेवला .
दिवाणाच्या उजव्या बाजूच्या छोटेखानी चोकलेटी रंगांच्या दोन खणात माझी
बरीचशी दुनिया साठलेली आहे याचा अचानक स्मरण झालं. वरच्या बाजूला पेशंट्स साठी
कायम लागणारी औषधं, ती बनवण्यासाठी लागणाऱ्या गोळ्या, डब्या , स्टिकर्स हे सगळं.
खालच्या बाजूला अतिशय प्रेमाने आणि हट्टाने जपून ठेवलेल्या बऱ्याच गोष्टी म्हणजे हाताने
बनवलेले book marks , काही विशिष्ठ आकारांचे पेपर होल्डर, लिखाणासाठीच्या अगणित
छोट्या छोट्या वह्या, काही वेगवेगळ्या सुवासिक मेणबत्त्या, माझा चित्रकलेचा बोर्ड,
खूप सारे रंग, ओईल पेंट्स, पोस्टर कलर्स,क्रेऑन्स ,रंगांनी पूर्ण अस्ताव्यस्त रंगलेली कलरिंग प्लेट , आणि हो कित्येक पुस्तकं, डायऱ्या..! सगळं काढून हाताळून , वास
घेऊन निवांतपणे बघावा असं एका बाजूला वाटत असतानाच , दुसरीकडे मात्र अतिशय उतावीळपणे
मी काहीतरी शोधत होते. बऱ्याच गोष्टी वर खाली झाल्या , आणि खालच्या खणात ,कोपऱ्यात
वरच्या बॉक्स सकट जपून ठेवलेली एक शाईची बाटली शेवटी सापडली.! खूप जुनी, कधी आणली
होती नक्की आठवत नव्हतं. मग दुसऱ्या आयुधाचा शोध, अर्थात शाईपेन , ते हि
असंच निपचित पडलेलं सापडलं, ......तळीराम शांत झाला!
एखादं अतीशय मौल्यवान काहीतरी सापडावं, असं मी त्या कॅमल च्या शाईच्या
बाटलीकडे बघितलं, हळूच ती बाहेर काढली आणि तिचं झाकण उघडायला सुरुवात केली...
मात्र... तोच परिचित आवाज , कुरकुर असा , थोड्याशा सुकलेल्या शाईचा, कानावर पडला
आणि मला अचानक अत्ताच जिवंत झाल्यासारखं वाटलं. झाकण उघडलं, निळ्या शाईची बाटली
होती, आणि शाई छान शाबूत होती. (आश्चर्यच खर तर.!) आता पुढचा किल्ला सर करायचा
होता, शाईपेन होतं, ते घेतलं , उघडलं आणि शाई भरायला सुरुवात केली. ( पेनाला
मराठीत ती पेन म्हणतात , की ते पेन म्हणतात...हे माझ्या दृष्टीने अजिबातच महत्वाचे
नाही..! ) ज्यावेळी मी ते शाईत बुडवलं, तेंव्हा एक मोठ्ठा चित्रपटच अचानक समोर
नाचू लागला. निळ्या, काळ्या , जांभळ्या ,
लाल शाईची कारंजं थुईथुई करू लागली. नजर भिरभिरू
लागली, आणि त्या कारंजांच्या प्रत्येक थेंबात काहीतरी म्हत्वाचं गवसू लागलं....
Nice one.. Waiting for your next blog....
ReplyDeleteHello Archana, yes it is in the pipeline, will notify you soon..! and thank you so much..!
Deleteहे Urja....!!
ReplyDeleteखरचं अप्रतिम लिहलस.....
मला ही शाईपेन हे लिखाण वाचल्यावर अगदी पुन्हा एकदा शाळेत असल्याचा क्षणभर भास झाला....
खरच तु हे लाखाण असच चालु ठेव.....मस्तच लिहितेस!!
हे Urja....!!
ReplyDeleteखरचं अप्रतिम लिहलस.....
मला ही शाईपेन हे लिखाण वाचल्यावर अगदी पुन्हा एकदा शाळेत असल्याचा क्षणभर भास झाला....
खरच तु हे लाखाण असच चालु ठेव.....मस्तच लिहितेस!!
Kshitija, that's really great to know, you were carried away with this up to the good old school days..! I wish everyone from that era could relate with this. yes and thanks much for reading and appreciating ....!
Deleteअप्रतिम लिहलस आहेस, मला ठाऊक नवतं तुझी मराठी इतकी छान आहे
ReplyDeletekeep it up.
Thank you so much Rakesh..! Yes.. I love languages and all their expressions, reading,writing..everything..!
ReplyDeleteApratim..chaan lihileyes..Keep it up!
ReplyDeleteSundarr.. style and content both... Aplya saglyankade ase kahi na kahi japun thevlelya wastu astat... tuzya lekhane lahan pani chya kiti tari athwani taajya kelya... kudos Dr. Urja...looking forward to read much more...
ReplyDeleteApratim!!! Baalpanichya athavani khup sahajpane parantu titakyach prabhaavipane tuzya shaaipenatun utaralya ahe Urja...it took me to good old days... i m sure..ya shaaipenatil shaai kadhich sampanar naahi ...thank u so much Doc!Eagerly waiting to ponder n go back to these days again..thru ur Shaaipen :-)
ReplyDelete